Green Initiative
डीडी विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा परिसर पाहिल्यास आपल्या लगेच लक्षात लक्षात येईल की संस्था पर्यावरण विषयक किती जागरूक आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी हे जास्तीत जास्त सायकलचा वापर करतात व पेट्रोल वाचवतात. काही जवळ राहणारे विद्यार्थी पायी येतात. महाविद्यालयांमध्ये एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीकडे जाण्यासाठी पायवाट आहे .महाविद्यालयाचा परिसर अतिशय रमणी आहे. महाविद्यालयामध्ये प्लास्टिक फ्री च्या जागोजागी पाट्या लावलेल्या आहेत की जेणेकरून विद्यार्थी प्लास्टिक बॅगचा वापर करणार नाहीत. महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये पेपरलेस व्यवहार चालतो. विद्यार्थ्यांना सूचना व माहिती what’s app द्वारे दिली जातात. कागदाचा वापर टाळला जातो. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपणास पहावयास मिळतात. संस्थेचे अध्यक्ष नेहमीच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना प्रोत्साहन देतात .अशा प्रकारे महाविद्यालयामध्ये ग्रीन प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंटेशन केलं जातं.
