










Welcome to Bapusaheb D.D. Vispute Shikshan Shastra Mahavidyalaya, Dhule
NCTE, Govt. of Maharashtra Recognized & Affiliated with Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
|| नोटीस ||
“Merit List for Institutional Round – CAP 2026”
कॉलेज कोड: 16004
दिनांक: २0 ऑक्टोबर २०२६
विषय: संस्थात्मक फेरी (Institutional Round) – CAP २०२६ गुणवत्ता यादी प्रसिद्धीबाबत.
प्रथम वर्ष बी.एड. (B.Ed.) वर्ष २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) नियमांनुसार रिक्त राहिलेल्या जागांसाठी संस्थात्मक फेरीची (Institutional Round) प्रथम गुणवत्ता यादी आज दिनांक २0 ऑक्टोबर २०२६ रोजी महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर आणि अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गुणवत्ता यादीत नाव आलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी खालील वेळापत्रकानुसार आपले प्रवेश निश्चित करावेत:
* प्रवेश घेण्याचा कालावधी: २1 ऑक्टोबर २०२६ ते २3 ऑक्टोबर २०२६ (सकाळी १०:०० ते दुपारी 6:०० वाजेपर्यंत).
* आवश्यक कागदपत्रे: सर्व मूळ कागदपत्रे (Original Documents), शैक्षणिक प्रमाणपत्रे, कॅप नोंदणी अर्ज (CAP Application Form) आणि पासपोर्ट साईज फोटो.
* प्रवेश फी: शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कासह प्रवेशाची फी भरणे अनिवार्य आहे.
महत्त्वाची टीप: ठरवून दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह आणि फीसह उपस्थित न राहिल्यास, उमेदवाराचा प्रवेशाचा हक्क आपोआप रद्द होईल व पुढील प्रतीक्षा यादीतील (Waiting List) उमेदवाराला संधी दिली जाईल.
पत्ता:
बापूसाहेब डी. डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय,
वलवाडी, ता. जि. धुळे.
स्वाक्षरी,
प्राचार्य / प्रवेश समिती प्रमुख
बापूसाहेब डी. डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, धुळे
